वर्धा,
bajaj seva trust वर्धा जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी सिंचनाशिवाय दुसरा पर्याय नाही, हीच वस्तुस्थिती ओळखून जमनालाल बजाज सेवा ट्रस्टने एक बदल घडवून आणला. या ट्रस्टने वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या ‘ऑल इज वेल’ या अनोख्या उपक्रमातून जिल्ह्यातील १०० कोरडवाहू शेतकर्यांच्या शेतात विहिरींचे खोदकाम करुन दिले. त्यामुळे शेतात पाण्याची सोय झाल्याने शेतकर्यांचे उत्पन्न अवघ्या वर्षभरात दुप्पट झाले.
वर्धा जिल्ह्यातील जमिनीच्या पोटात मुबलक पाणी उपलब्ध आहे, मात्र ते विहिरीच्या माध्यमातून शेतातील पाटापर्यंत पोहोचवण्याची आर्थिक क्रयशती सामान्य कोरडवाहू शेतकर्यांकडे नाही. त्यामुळे विहीर खोदण्याची हिंमत शेतकरी करत नव्हते. हीच अडचण लक्षात घेऊन बजाज सेवा ट्रस्टने कोरडवाहू शेतकर्यांसाठी ‘ऑल इज वेल’ हा उपक्रम सुरू केला. केवळ १० टके शेतकर्यांचा सहभाग आणि ९० टके ट्रस्टचा वाटा यातून उभ्या राहिलेल्या या विहिरींमुळे शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली आहे.
शिक्षा मंडळ या संस्थेच्या बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेनॉलॉजी आणि आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतन येथील तज्ज्ञ रेसिस्टिव्हिटी मीटरच्या सहाय्याने विहिर खोदण्यासाठी शेतात योग्य जागेची निवड करतात. त्यानंतर पोकलॅनव्दारे ४० फुट खोलपर्यंत खोदकाम केले जाते. खोदकामाकरिता साधारणत: १ लाखांपर्यंतचा खर्च येतो. यात शेतकर्यांचा १० टके वाटा असून बांधकामाचा खर्च शेतकर्यांना करायचा आहे. शेतकर्यांना खोदकाम करून दिल्यावर पाणी दिसले की ते उत्साहाने बांधकामास पुढाकार घेत आहे.
बुडीत शेतीही आणली लागवडीखाली
या ट्रस्टच्या माध्यमातून शेतकर्यांना विहिरी खोदून देण्यासोबतच नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचेही काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जी शेती पावसाळ्यात नाल्याच्या पाण्याखाली येऊन पडीत राहत होती. अशा नाल्यांचे खोलीकरण करून तब्बल २० हजार एकर पडीत राहणारी जमीन लागवडीखाली आणल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला.
जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट जिल्ह्यात सातत्याने शिक्षण आणि शेती या दोन विषयावर काम करीत आहे. bajaj seva trustनाला खोलीकरण व विहिरीचे खोदकाम यातून शेतकर्यांच्या जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ‘ऑल इज वेल’ या उपक्रमातून वर्षभरात १०० शेतकर्यांच्या शेतात विहिरी पूर्ण झाल्या.bajaj seva trust सोबतच २० हजार एकर शेती लागवडीखाली आणल्याची माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भार्गव यांनी दिली.