अर्जुनी मोरगाव,
Arjuni Morgaon Shaken दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना तालुक्यातील बोंडगावदेवी येथे सोमवारी 25 मे रोजी उघडकीस आली. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी 16 वर्षीय विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याला बाल न्यायालयात हजर केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 23 मे रोजी सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास घडली असून आरोपीने घराशेजारी राहणार्या पिडीत अल्पवयीन मुलींना खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्यांच्यावर अत्याचार केला. संबंधित मुलींपैकी एकीचे वय अवघे 6 वर्ष 9 महिने, तर दुसरीचे वय 10 वर्ष 8 महिने आहे. यातील एक पिडीत मुलगी ही आरोपीची चुलत बहीण असल्याचे सांगण्यात येत आहे. Arjuni Morgaon Shaken घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून संबंधित विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलिस करीत आहेत.