१४ कोटींची रोकड, मर्सिडीज, किलोभर सोने

ढोंगी अशोक खरातची संपत्ती जप्त

    दिनांक :25-May-2026
Total Views |
मुंबई
Ashok Kharat case लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाèया आणि ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाèया नाशिकच्या भोंदू अशोक खरातला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. त्याची संपत्तीही जप्त केली आहे.
 
ashok kharat1
 
Ashok Kharat case मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने आरोपी अशोक खरातला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण, बलात्कार आणि व्यापाèयांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीने ही मोठी कारवाई केली आहे.
Ashok Kharat case  स्वत:ला म्हणायचा शंकराचा अवतार
ईडीच्या तपासात खरातबद्दल धक्कादायक खुलासे झाले आहेत. तो स्वत:ला भगवान शंकराचा अवतार सांगत असे. आपल्याकडे अलौकिक शक्ती आणि दिव्य ज्ञान असल्याचा दावा करून तो भाविकांना जाळ्यात ओढायचा. कसले तरी विधी, अघोरी प्रथा आणि काळ्या जादूची भीती दाखवून तो लोकांमध्ये म्त्यूची भीती निर्माण करायचा. आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली त्याने अनेकांना कोट्यवधी रुपयांना लुटले आहे.