ब्रम्हपुरी,
Brahmhapuri's at 47 degrees ब्रम्हपुरीचे तापमान 21 मे पासून सातत्याने 47 अंश सेल्सिअसच्यावर असून, वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. 25 मे रोजी तर सर्वाधिक 47.6 अंशे सेल्सिअसवर तापमान पोहोचले आहे. विदर्भात मागील 15 दिवसापासून सलग उष्णतेची लाट असून, दिवसेंदिवस तामपानाचा पारा वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्याचे तापमान 45 अंशाच्यावर गेले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराच्या तापमानाने तर उच्चांक गाठला आहे. यंदा ब्रम्हपुरी देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. 21 मे पासून मागील चार दिवसात 47.1, 47.2, 47.1, 47.2 आणि 47.6 अंशे सेल्सिअस असे ब्रम्हपुरीचे तापमान नोंदविल्या गेले आहे. सकाळी 10 वाजेपासूनच उष्ण वारे वाहत असल्याने दिवसा घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ दिसत नाही. रात्रीही उष्ण वारे वाहत आहेत. ब्रम्हपुरीत शुक्रवारी आठवडी बाजारात भाजीपाला विक्रीची दुकाने लागली. मात्र वाढत्या उष्णतेमुळे दुपारी नागरिक बाजाराकडे फिरकलेच नाही. त्यामुळे खर्या अर्थाने सायंकाळी 6 ते रात्री 8 या कालावधीतच बाजार काही प्रमाणात भरला. 25 मेपासून नवतपाला सुरूवात झाली आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण नऊ दिवस, यावेळेस नवतपा 25 मे पासून 2 जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा आणखीवर जाण्याची शक्यता असल्याने जनतेने आवश्यक कामाला प्राधान्य देऊन वाढत्या तापमानापासून बचाव करावा व तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चंद्रपूर महानगरही 46 अंश सेल्सिअस
चंद्रपूरः ब्रम्हपुरी पाठपोठ नागपूर 46.5, गडचिरोली 46.4, गोंदिया 46.1, चंद्रपूर 46.0, अकोला 45.4, यवतमाळ 44.4, वाशिम 43.5, तर बुलढाणा जिल्ह्यात 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.