संस्कारांच्या शिदोरीसह बाल शिबिराचा समारोप

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नागपूर,
Childrens Camp हनुमान मंदिर, सुयोग नगर परिसरात लोक कल्याण समितीतर्फे बाल संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात परिसरातील सुमारे ४० मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेत संस्कार, कला आणि मनोरंजनाचा आनंद लुटला. संस्कार वर्गामध्ये खेळ, गाणी, नृत्य, चित्रकला, योगासने, गोष्टी, श्लोक आदी विविध उपक्रमांद्वारे मुलांना संस्कारांची सुंदर शिकवण देण्यात आली.
 
 
Childrens Camp
 
या वर्गात गीता परिवाराच्या रेखा पराते यांनी शिक्षिका म्हणून मार्गदर्शन केले. संस्कार वर्गाच्या समारोपानिमित्त विविध वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Childrens Camp यावेळी लोक कल्याण समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह नगरसेविका विशाखा मोहोड उपस्थित होत्या. भारतमाता पूजन करून संस्कार वर्गाचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला.
सौजन्य: अर्चना सोनकुसरे, संपर्क मित्र