डॉ. दळवी स्मृतिदिन कार्यक्रमात मान्यवरांचा सहभाग

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नागपूर,
Dr. Dalvi Memorial Program गरोबा मैदान, टेलिफोन एक्सचेंज चौक येथील डॉक्टर दळवी अनुसंधान रुग्णालयात डॉ. बाळ पांडुरंग दळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष पराग सराफ, नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, नगरसेवक श्रीकांत आगलावे, कल्पक भनारकर, नगरसेविका तथा गांधीबाग झोनच्या सभापती उमा देशमुख, कल्पना शर्मा, तसेच दळवी रुग्णालयाचे उपाध्यक्ष सुभाष गोतमारे, सचिव पुरुषोत्तम घाटोळे, महादेवराव भोयर, गणेश नेउलकर आणि तिरळे कुणबी समाज संस्थेचे सचिव सुरेश जिचकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
Dr. Dalvi Memorial Program
 
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाळ पांडुरंग दळवी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या योगदानाला अभिवादन केले. तसेच रुग्णालयाच्या कार्यपद्धती आणि भविष्यातील योजनांबाबतही माहिती देण्यात आली. Dr. Dalvi Memorial Program कार्यक्रम यशस्वीरीत्या आणि स्मृतिपूर्ण वातावरणात पार पडला.
 
सौजन्य: अंशुल जिचकार, संपर्क मित्र