घोट येथील लाकूड डेपोला आग, 350 बीट खाक

कोट्यवधींचे नुकसान, उपाययोजनांकडे दुर्लक्ष

    दिनांक :25-May-2026
Total Views |
गडचिरोली,
Fire at Ghote Wood Depot जवळच्याच एका शेतात लागलेली आग वार्‍याच्या वेगाने पसरल्यामुळे वन विभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घोट येथे घडली. या आगीच्या तांडवात तब्बल 350 हून अधिक लाकडांचे बीट जळून खाक झाले असून वन विभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
 
Fire at Ghote Wood Depot
 
रविवारी सायंकाळी अचानक शेतातील आग पसरत वन विभागाच्या लाकूड डेपोपर्यंत पोहोचली. या डेपोमध्ये पळसगाव जंगल कामगार संस्थेचेही मौल्यवान लाकडांचे बीट साठवून ठेवण्यात आले होते. या आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने रौद्ररुप धारण केले. Fire at Ghote Wood Depot ही आग पसरतच गेली. या आगीत 300 हून अधिक बीट जळाले. दरम्यान, येथूनच अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या भाडभिडी जंकासच्या (जंगल कामगार संस्था) लाकूड डेपोलाही याच वेळी भीषण आग लागून 50 बीट जळाले.
 
 
शासकीय आणि खासगी अशा दोन्ही अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिक आणि वन कर्मचार्‍यांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सायंकाळी सुरू झालेले हे अग्निशमन कार्य रात्री 8 वाजेपर्यंत सातत्याने सुरूच होते. काही तासांनी आग आटोक्यात आली. Fire at Ghote Wood Depot रविवारी साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे निवडक कर्मचारी कार्यालय परिसरात उपस्थित होते. दुपारच्या सुमारास शेतशिवारातून आग पसरली व ती थेट लाकूड डेपोला लागली. डेपो परिसरातील कचरा साफ केलेला असता तर कदाचित बीट जळाले नसते.
 
 
डेपोला आग लागल्याची माहिती मिळताच वनाधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चामोर्शी नगर पंचायतीच्या अग्निशमन वाहनाला पाचारण केले. दोन ठिकाणी आग लागल्याने व आगीचे रौद्ररूप पाहता ती आटोक्यात आणणे कठीण झाले होते. Fire at Ghote Wood Depot त्यामुळे तातडीने कोनसरी येथूनही एका खासगी कंपनीचे अग्निशमन वाहन बोलविण्यात आले.
 
 
चामोर्शी नगर पंचायतचे अग्निशमन वाहन तब्बल 1 तासानंतर आले. मात्र, रात्रीचे 7.45 वाजूनही कोनसरी येथील अग्निशमन वाहन घटनास्थळी आले नव्हते. Fire at Ghote Wood Depot त्यामुळे बहुतांश लाकूड बिटांचा कोळसा झाला. आग विझविण्यासाठी स्थानिक कर्मचार्‍यांनी धावपळ केली. वरिष्ठ अधिकार्‍यांनीही यंत्रणेला कळविले. मात्रु दिरंगाई झाल्याने शेकडो बीट जळून खाक झाले.
 
 
गडचिरोली वनवृत्त कार्यालयांतर्गत बांबू, लाकूडबीट व इतर वनोपज विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल दरवर्षी होते. मात्र वन विभागाकडे अग्निशमन वाहन नाही. Fire at Ghote Wood Depot दुय्यम बाबींवर मोठ्या प्रमाणात निधीची उधाळपट्टी केली जाते. मात्र अग्निशमन वाहन का खरेदी केले जात नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.