दैत्य गडावर आगीचा दैत्यावतार!

३४.८९ हेटरवरील वनसंपदेचे नुकसान

    दिनांक :25-May-2026
Total Views |

wardha 
 
 
वर्धा,
Fire on Daitya Gad बोर व्याघ्र प्रकल्पातील दैत्य गड परिसर आगीत चांगलाच होरपळून निघाला. ती आग विझली असली तरी आगीत परिसरातील तब्बल ३४.८९ हेटरवरील वनसंपदा जळून राख झाल्याने पर्यावरणाची लाख मोलाची हानी झाली आहे.बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील दैत्य गड भागात धुमसत असलेल्या आगीने टेकडी परिसरातील सुमारे तीन प्रकारचे वाळलेले गवत व इतर वनसंपदेला आपल्या कवेत घेतले होते. आग विझविण्यासाठी २१ मे रोजी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. न्यू बोर व हिंगणी बफरच्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांसह त्यांच्या सहकार्‍यांनी मध्यरात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग विझविताना काही कर्मचार्‍यांची प्रकृतीही ढासळली होती. या आगीत उमरविहिरी बिटाच्या नवरगाव राऊंड मधील सुमारे ८.९ हेटर, नवरगाव उत्तर बिटाच्या नवरगाव राऊंड मधील ९.८० हेटर तर मेट बिटातील नवरगाव राऊंडमधील तब्बल १७.९ हेटर वनसंपदेचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. या आगीत प्रामुख्याने तृणभक्ष्यांसाठी उपयुत ठरणारे तीन प्रकारचे गवत, औषधी गुणधर्मांनी युत असलेल्या भेरा, तेंदू व कडुनिंबाची वृक्ष मोठ्या प्रमाणात जळाली.