पद्मभूषण ते पद्मश्री; देशातील दिग्गजांचा सन्मान!

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
From Padma Bhushan to Padma Shri राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या भव्य समारंभात देशातील ६६ नामवंत व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात कला, क्रीडा, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव करण्यात आला. या वर्षीचा सर्वात भावनिक क्षण ठरला तो दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांना गौरविण्यात आले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना देखील पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
padma
 
 
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. तसेच महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिलाही पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले. अभिनेते आर. माधवन, ममूटी आणि पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांचाही पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला. सरकारने यावर्षी एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, २५ मे रोजी ६६ जणांना प्रत्यक्ष सन्मानित करण्यात आले. उर्वरित पुरस्कार पुढील टप्प्यात प्रदान केले जाणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.