गोकुळच्या सत्तेसाठी राजकीय शक्तिप्रदर्शन

जिल्ह्यात बैठका आणि संपर्क दौरे सुरू

    दिनांक :25-May-2026
Total Views |
कोल्हापूर,
Gokul Election news कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक अखेर मार्गी लागली असून निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. न्यायालयीन प्रक्रिया आणि मतदार याद्यांवरील वादामुळे काही महिन्यांपासून रखडलेली निवडणूक प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून विविध गटांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रियेअंतर्गत दोन जून २०२६ पासून ठराव संकलनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर एक जुलै २०२६ ही ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संस्थांमध्ये बैठका, संपर्क दौरे आणि रणनीती आखण्याचे सत्र सुरू झाले आहे.
 
 
gokul
 
गोकुळ दूध संघावर सत्ता मिळवण्यासाठी विविध राजकीय गट सक्रिय झाले असून विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर आता नव्या सत्तासमीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. जिल्हाभरातील दूध संस्थांमध्ये सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ठरावांच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे डावपेच आखले जात असल्याने येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित नसून कोल्हापूरच्या राजकारणातही तिचे मोठे महत्त्व मानले जाते. त्यामुळे कोणता गट गोकुळच्या सत्तेवर वर्चस्व मिळवतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.