लवकरच होणार ‘गेमचेंजर’ राफेल डील!

भारतीय हवाई दलाला मिळणार बूस्ट

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
indian air forces भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ११४ अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेला मोठी गती दिली आहे. भारताने फ्रान्सकडे पाठवण्यात येणाऱ्या ‘लेटर ऑफ रिक्वेस्ट’ला (LoR) अंतिम स्वरूप दिले असून, पुढील काही आठवड्यांत हा प्रस्ताव अधिकृतपणे फ्रान्स सरकारकडे पाठवला जाणार आहे. या निर्णयामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रस्तावित करारानुसार, ११४ पैकी तब्बल ९० राफेल विमाने भारतातच तयार केली जाणार आहेत. फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतीय भागीदार कंपनीच्या सहकार्याने ही विमाने निर्मिती केली जातील. उर्वरित २४ विमाने थेट ‘फ्लाय-अवे’ स्थितीत भारताला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

indian air forces 
 
 
३६ राफेल कार्यरत
सूत्रांच्या माहितीनुसार, फ्रान्सकडून ‘लेटर ऑफ रिक्वेस्ट’ला प्रतिसाद मिळाल्यानंतर भारत सरकार औपचारिक ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल’ जारी करेल. त्यानंतर किंमत, तांत्रिक क्षमता, लॉजिस्टिक सपोर्ट आणि देखभाल यासंबंधी दोन्ही देशांमध्ये सविस्तर चर्चा सुरू होणार आहे. अंतिम करार होण्यापूर्वी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची मंजुरी आवश्यक असेल.भारतीय हवाई दलाकडे सध्या ३६ राफेल विमाने कार्यरत आहेत. याशिवाय भारतीय नौदलही भविष्यात २६ राफेल-एम लढाऊ विमाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे. आधीपासून अस्तित्वात असलेल्या राफेल परिसंस्थेमुळे नव्या विमानांच्या समावेशानंतर प्रशिक्षण, देखभाल आणि लॉजिस्टिक खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे.
‘मेक इन इंडिया’ला मोठे प्राधान्य
भारताने या करारात ‘मेक इन इंडिया’ला मोठे प्राधान्य दिले आहे. प्रस्तावित विमानांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत स्वदेशी सामग्रीचा वापर करण्याची अट भारताने फ्रान्ससमोर ठेवली आहे. त्यामुळे भारतीय कंपन्यांना संरक्षण उत्पादन क्षेत्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.indian air forces संरक्षण खरेदी परिषदेकडून या मेगा खरेदी प्रस्तावाला आधीच मंजुरी मिळाल्यामुळे आता वाटाघाटींना वेग आला आहे. हा करार अंतिम झाल्यास तो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संरक्षण करारांपैकी एक ठरेल. तसेच फ्रान्स हा रशियानंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा संरक्षण भागीदार म्हणून अधिक मजबूत होणार आहे.
हे.