तुम्ही खाल्लेला हापूस ‘काेकणी’ की ‘कर्नाटकी’ ?

    दिनांक :25-May-2026
Total Views |
‘देवगड’च्या नावे माेठ्या प्रमाणात विक्री
किमतींमध्ये माेठी तावत

नागपूर, 
‘King of Konkan’ : Hapus Mango उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंब्यांचा सुगंध दरवळू लागताे. ‘काेकणचा राजा’ म्हणून परिचित असलेला हापूस हा फळांचाही राजा. त्यामुळे हापूस आंब्याचे शाैकीन असलेले नागपूरकर खिसा माेकळा करून ताे खरेदी करतात. परंतु ‘देवगड हापूस’ या नावाखाली इतर जातींचे आंबे विकले जात असल्याने ग्राहकांची फसवणूक वाढत आहे. त्यामुळे तुलनेत स्वस्तात मिळणारा हा हापूस ‘काेकणी’ की ‘कर्नाटकी’ हे जाणून घेणे गरजेचे आहे.
 

HAPUS 
 
सध्या नागपुरात अनेक चाैकांत, रस्त्याच्या कडेला आकर्षक पॅकिंग असलेले आंबे देवगड हापूस या नावाने विकले जात आहेत. परंतु हा आंबा देवगडचा नसून कर्नाटकचा असल्याची शक्यता विक्रेते व्यक्त करतात. जवळ 12 वर्षांपासून नागपुरात हापूस विक्रीचा व्यवसाय करणारे नरेंद्र गिरीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय्यतृतीयेनंतर आंबा खायचा अशी नागपुरातील लाेकांनी मानसिकता आहे. तर पुण्यात फेबुव्रारीपासूनच आंबा खायला सुरुवात हाेते. ‘देवगड’ आणि ‘रत्नागिरी’ या आंब्याच्या काेकणातील दाेन माेठ्या बाजारपेठ आहेत. त्यामुळे काेकणातील आंबा या दाेन्ही नावांनी प्रसिद्ध आहे. हल्ली देवगडची बाजारपेठ विस्तारत असल्याने तिथला हापूस जास्त प्रसिद्ध हाेत आहे.
 
 
खरा हापूस विकणारे नागपुरात फारच कमी
गिरीधर हे अनेक वर्षांपासून खास काेकणातील बागायतदारांकडून आंबा थेट खरेदी करीत आहेत. ते सांगतात केवळ सात ते आठ विक्रेते हे अशा बागायतदारांकडून थेट आंबा विक्रीला आणतात. जानेवारी महिन्यात आंबा यायला लागल्यानंतर बागायतदार अशा खास विक्रेत्यांशी संपर्क साधून किती आंबा येणार आणि आम्ही किती पाठवू शकणार याविषयी कल्पना देतात. मार्च महिन्यात आलेली पहिली खेप ही जरा महाग असते. त्यानंतर वातावरणानुसार आंबा किती उत्पादित झाला यावर पुढचे तर ठरतात. पण 1800 ते 1000 असा डझनाचा भाव राहत असल्याचे ते सांगतात.
कर्नाटकी हापूस व्हाया रत्नागिरी
गेल्या काही वर्षांत कर्नाटकातील हापूस आंब्याची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे. दिसायला जरी ताे सारखाच असला तरी चव आणि गंध यात फरक आहे. देवगडच्या तुलनेच ताे कमी किमतीला विकला जाताे. पण त्यातील फरक ज्याने काेकणातील हापुस चाखला आहे त्यालाच कळू शकते. विशेष म्हणजे कनाटकातील विक्रेतेही हुशारी करून ताे आंबा रत्नागिरीच्या मार्केटमध्ये आणतात आणि तेथून त्याची विक्री करतात. त्यामुळे बाहेर ताे आंबाही काेकणातील हापूस या नावाने खपताे आणि ग्राहकांची फसवणूक हाेते.

जीआय टॅगचे संरक्षण आणि स्कॅनिंग
देवगड आणि रत्नागिरी हापूसला जीआय टॅग मिळाला आहे. त्यामुळे त्या भागातील उत्पादकांनाच अधिकृतपणे हे नाव वापरण्याचा अधिकार आहे. मात्र प्रत्यक्ष बाजारात जीआय स्टिकरचा वापर कमी प्रमाणात दिसताे. त्यामुळे ग्राहकांनी हापूस खरेदी करताना टॅग पाहणे गरजेचे आहे. तसेच बागायतदार प्रत्येक आंब्याचे परीक्षण करून ते खेट विक्रीला पाठवितात. त्यामुळे हा आंबा 100 टक्के चांगला असताे असे गिरीधर सांगतात.

खरा देवगड हापूस कसा ओळखायचा?
‘King of Konkan’ : Hapus Mango  यासंदर्भात नरेंद्र गिरीधर सांगतात, नैसर्गिक सुगंध ही देवगड हापूसचा पहिली ओळख. त्याचा रंग केशरी-पिवळा असताे पण ताे अति चमकदार नसताे. मध्यम लंबगाेल आकार असलल्या या आंब्यात तंतुमुक्त असताे. हातात घेतल्यावर ताे वजनदार जाणवताे. सालीवर नैसर्गिक छटा आणि छाेटे डाग असतात. विशेष म्हणजे देवगडचा हापूस हा बाहेरून खराब हाेत नाही. ताे आतून घुईपासून खराब व्हायला लागताे. तसेच ताे जुना व्हायला लागल्यावर त्याला सुरकुत्या पडतात. इतर आंब्याप्रमाणे ताे मधून दबन जात नाही.