शेड नाही, बसस्टॉप नाही; प्रवाशांचे हालच हाल

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नागपूर,
Medical Chowk नागपुरासह संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमान दररोज ४६ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. हवामान विभागाकडून हिटवेव्हची चेतावणी देण्यात आली असतानाही शहरातील अनेक बसथांब्यांवर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा नसल्याचे वास्तव समोर येत आहे. विशेषतः मेडिकल चौक परिसरात नागरिकांना भर उन्हात बसची वाट पाहावी लागत असून, प्रवाशांसाठी साधा बस निवारा किंवा सावलीची व्यवस्था देखील नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 
Medical Chowk
 
काल दुपारच्या सुमारास मेडिकल चौकात बर्डीकडून येणाऱ्या महानगरपालिकेच्या बसची वाट पाहताना अनेक प्रवासी उन्हात उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. Medical Chowk उन्हाचा चटका इतका तीव्र होता की नागरिकांना काही मिनिटेही तिथे थांबणे कठीण जात होते. मात्र बसथांब्यावर ना शेड, ना बस स्टॉपचा स्पष्ट फलक, ना बस निवारा त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
मेडिकल चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा परिसर मानला जातो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या कार्यालयांमुळे येथे दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. Medical Chowk तरीही बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतीही कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेता महानगरपालिका आणि परिवहन प्रशासनाने तातडीने बस निवारे उभारणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि बसथांब्यांचे नियोजन सुधारणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. Medical Chowk नागपूर स्मार्ट सिटीच्या गप्पा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात प्रवाशांना अजूनही भर उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याचे वास्तव मेडिकल चौकात पाहायला मिळत आहे.
सौजन्य: मुकेश साळवे, संपर्क मित्र