संस्कारवर्धक उपक्रमांनी रंगले बालसंस्कार शिबिर

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur News विश्वमांगल्य बालसभा, महिला प्रबोधन मंडळ, नागपूर आणि हनुमान मंदिर देवस्थान, माधव नगर यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप झाला. या शिबिरात सुमारे ३५ बालकांनी सहभाग घेतला. शिबिरादरम्यान गीतापठण, योगासने, सूर्यनमस्कार, नृत्य, हस्तकला, समूहगीत तसेच विविध संस्कारवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमांच्या अंतर्गत २३ मे रोजी पर्यावरण दिंडीही काढण्यात आली.
 
Nagpur News
 
समारोप कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या ॲड. पद्मा चांदेकर यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर आयोजक समिती सदस्य आणि विविध उपक्रमांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. प्रार्थनेनंतर मास्टर विश्रुत याने शिबिरातील विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. यावेळी महिला प्रबोधन मंडळाच्या अध्यक्षा विजया पाध्ये, विश्वमांगल्य बालसभेच्या संयोजिका मंजिरी अलोणी तसेच हनुमान मंदिर देवस्थानतर्फे अविनाश घांग्रेकर उपस्थित होते. Nagpur News कार्यक्रमात बालकांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. देवश्री कडवे आणि तनिष्का जाधव यांनी युगल नृत्य सादर केले, तर विजयालक्ष्मी वंजारी यांनी “दिल है छोटासा” या गीतावर नृत्य सादर केले.
श्रुहा दामोदर हिने अथर्ववेदावरील सादरीकरण, गार्गी खराळकर हिने बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील नाट्यप्रयोग, रेयांशी चिमोटे हिने श्रीहनुमान स्तोत्र, श्रावी चांदूरकर हिने ऋतूंवरील मराठी गीत, श्लोक कुहेकर यांनी ज्ञानेश्वरी अध्याय पठण तसेच अथर्व यांनी गणपती स्तोत्र सादर केले. समूह सादरीकरणामध्ये संस्कारगीत, सूर्यनमस्कार व योगासनांचे प्रात्यक्षिक तसेच श्रीमद्भगवद्गीतेतील निवडक श्लोकांचे पठण करण्यात आले. “देश रंगीला रंगीला” या गीतावरील समूह नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. Nagpur News प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार, शिस्त आणि सकारात्मक जीवनमूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.
 
कार्यक्रमाचा समारोप प्रमाणपत्र वितरण, जयघोष, आभार प्रदर्शन आणि अल्पोपहाराने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी घांग्रेकर यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विजया पाध्ये, तृप्ती आकांत, Nagpur News आरती जोशी, वर्षा गीड, निशा पटवर्धन, आरती देशपांडे, हेमांगी काळे, कांचन घांग्रेकर, शुभ्रा चांदूरकर, अंजली चोरघडे आणि डॉ. मृण्मयी लोखंडे यांनी सहकार्य केले.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र