38 वर्षांपासून सौर चुलीवर स्वयंपाक

नागपूरच्या आशाताईंची अनोखी जीवनशैली

    दिनांक :25-May-2026
Total Views |
मिनल चतुरपाळे
नागपूर
Asha Hanwatkar देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि गॅस टंचाईच्या पृष्ठभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडत चालले आहे. जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महागाईचा भडका उडाला आहे. गॅस सिलेंडरचे दर वाढले असून अनेक ठिकाणी सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींची चिंता वाढली आहे. ‘गॅस मिळाला नाही तर स्वयंपाक करायचा कसा?’ असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा असतांना नागपुरातील एका महिलेने गेली तब्बल 38 वर्षे पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय जपून ठेवला आहे.
 
 


Asha Hanwatkar  
सध्याची जागतिक Asha Hanwatkar स्थिती लक्षात घेता इंधनाचा मर्यादित आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नागपूरमधील आशाताई हनवटकर यांनी याच विचारातून सोलर कुकरचा वापर आपल्या जीवनशैलीचा भाग बनवला आहे. उज्वल नगर रहिवासी आशाताई हनवटकर या गेल्या 38 वर्षांपासून सौर चुलीवर स्वयंपाक करत आहेत. गॅस, लाकूड किंवा विजेवर अवलंबून न राहता सूर्याच्या उष्णतेचा वापर करून त्या दररोजचे जेवण तयार करतात. आज गॅसटंचाई आणि वाढत्या खर्चाच्या काळात त्यांची ही संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. 1988 मध्ये लग्नात भेट मिळालेला हा सोलर कुकर आजही त्यांच्या दैनंदिन वापरात आहे. गॅसवर अवलंबून न राहता सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वयंपाक करता येत असल्याने त्यांनी याला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवला आहे.सोलर कुकरमध्ये भात, वरण, खिचडी, बटाटे, यांसारखे पदार्थ सहज तयार होतात. त्यामुळे वर्षभरात गॅस सिलेंडरची मोठी बचत होत असल्याचा अनुभव त्यांनी संगितला. विशेष म्हणजे यासाठी वीज किंवा अतिरिक्त इंधनाची गरज लागत नाही.
 

सूर्याच्या उष्णतेवर शिजते अन्न

 
सोलर कुकर म्हणजेच सौर Asha Hanwatkar चुलीमध्ये सूर्यकिरणांचे उष्णतेत रूपांतर केले जाते. कुकरमध्ये असलेले आरसे आणि परावर्तक पत्रे सूर्यकिरण एका ठिकाणी केंद्रित करतात. आत ठेवलेली काळ्या रंगाची भांडी ही उष्णता अधिक प्रमाणात शोषून घेतात. काचेच्या झाकणामुळे आत तयार झालेली उष्णता बाहेर जात नाही. यालाच ङ्गग्रीनहाऊस इफेक्टङ्घ म्हटलं जातं. त्यामुळे कुकरमधील तापमान 100 ते 140 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते आणि भात, डाळ, भाज्या, चहा यांसारखे पदार्थ नैसर्गिक पद्धतीने शिजतात. भारतामध्ये बॉक्स प्रकारातील सोलर कुकरचा सर्वाधिक वापर केला जातो. यात साधारण तीन ते चार तासांत अन्न शिजते, तर चिकन आणि मटण शिजण्यासाठी चार ते पाच तास लागतात.सोलर कुकरमध्ये अन्न कमी तापमानावर हळूहळू शिजत असल्याने त्यातील पोषकतत्त्वे टिकून राहतात. कमी पाण्याचा वापर होत असल्यामुळे जीवनसत्त्वे नष्ट होत नाहीत. अन्न जळत नाही तसेच त्याची नैसर्गिक चव आणि सुगंध कायम राहतो. त्यामुळे सौर चुलीवर तयार झालेले अन्न आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.