आता जात्यावर काढा पीठं!

गॅसनंतर दळणाची दरवाढ

    दिनांक :25-May-2026
Total Views |
पुणे
Pune News महागाईच्या झळांनी आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना आता दळणाच्या दरवाढीमुळे गृहिणींच्या मासिक बजेटवर आणखी ताण पडणार आहे. पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाने १ जूनपासून दळणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गहू, ज्वारी यांसारख्या धान्याच्या दळणासाठी आता प्रतिकिलो १० रुपये मोजावे लागणार आहेत. तर डाळ, भाजणी आणि इतर पदार्थांच्या दळणासाठी प्रतिकिलो १५ रुपये आकारले जाणार आहेत.

floor mills
Pune News सध्या सर्वसाधारण दळणासाठी 8 रुपये प्रतिकिलो दर आकारला जात होता. मात्र, वाढती महागाई, गिरणीसाठी लागणाèया सुट्या साहित्यांच्या वाढलेल्या किमती, वीजबिलाचा वाढता भार आणि गिरणी कामगारांच्या पगारवाढीच्या मागण्यांमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाचे अध्यक्ष लुईस सांगळे यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या संघाच्या कार्यकारिणी बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला.
Pune News या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघरावर होणार आहे. आधीच घरगुती गॅस सिलेंडर, खाद्यतेल, डाळी आणि भाजीपाल्याच्या वाढत्या दरांमुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात आता रोजच्या जेवणातील पोळी-भाकरीसाठी लागणाèया दळणावरही अधिक खर्च करावा लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.