26 मेपासून 14 दिवस जमावबंदी लागू

    दिनांक :25-May-2026
Total Views |
पुणे,
Pune police शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून उद्या, 26 मे 2026 च्या रात्रीपासून पुणे शहरात जमावबंदीचे आदेश लागू होणार आहेत. हे आदेश 8 जून 2026 पर्यंत म्हणजेच सलग 14 दिवस लागू राहणार असून या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्यावर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत.
 

Pune police  
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून संभाव्य आंदोलनांची शक्यता लक्षात घेता, तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. बकरी ईदसह इतर सणांच्या काळात शांतता राखणे हेही या आदेशामागील एक प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
या आदेशानुसार शहरात Pune police  पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येणे, सभा घेणे, मोर्चे किंवा मिरवणुका काढणे यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच तलवार, भाला, काठी, लाठी किंवा इतर शस्त्र अथवा इजा करू शकतील अशा वस्तू सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास मनाई असेल. ज्वलनशील, दाहक किंवा स्फोटक पदार्थांचे वहन करण्यावरही निर्बंध लागू राहतील. सार्वजनिक शांतता भंग होईल अशा घोषणा, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्य वाजवणे यालाही प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
 
 
दरम्यान, इंधन बचतीच्या उद्देशानेPune police  पुणे महापालिकेनेही काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. पंतप्रधान यांनी देशभरातील नागरिकांना इंधन वापरात काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर, पुणे महानगरपालिका प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.या सूचनांनुसार, अधिकाऱ्यांनी शक्य असल्यास कारपूलिंगद्वारे प्रवास करावा, आवश्यक कार्यालयीन दौऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, तसेच आठवड्यातून किमान एक दिवस लोकल किंवा मेट्रोने प्रवास करणे अपेक्षित आहे. याशिवाय सर्व बैठका, प्रशिक्षण सत्रे आणि चर्चासत्रे शक्यतो ऑनलाइन पद्धतीने घेण्यावर भर देण्यात आला आहे.पुणे शहरातील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेले हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.