मला १६ मुलं आहेत.. राखी सावंतच्या वक्तव्याने खळबळ

    दिनांक :25-May-2026
Total Views |
मुंबई
Rakhi Sawant अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या राखीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत “मला १६ मुलं आहेत” असे वक्तव्य करत सर्वांनाच धक्का दिला. मात्र नंतर तिने या विधानामागचा नेमका अर्थ स्पष्ट केला.
 

Rakhi Sawant, Rakhi Sawant 16 children statement 
अलीकडेच संपलेल्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात राखी सावंत आणि अभिनेता राकेश बापट यांच्यातील नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. बिग बॉसच्या घरात असताना राखीने अनेकदा राकेशबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिने त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगत त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आपण त्याला आवडत नसल्याची आणि त्याचे कुटुंब आपल्याला स्वीकारणार नसल्याची खंतही तिने व्यक्त केली होती.याचदरम्यान राखीने राकेशकडे मूल होण्यासाठी स्पर्म डोनेट करण्याची विनंती केल्याचेही सांगितले होते. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. आता पुन्हा एका मुलाखतीत राखीने “माझी १६ मुलं फ्रिजमध्ये आहेत” असे म्हणत नवा खुलासा केला आहे.
राखीच्या या विधानामुळे सुरुवातीला अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र नंतर तिने स्पष्ट केले की, तिने तिचे एग्ज फ्रीझ करून ठेवले आहेत आणि त्याचाच उल्लेख ती “१६ मुलं” असा करत होती. आईच्या सल्ल्यानुसार आपण एग्ज फ्रीझ करण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने सांगितले.
 
 
एका मुलाखतीदरम्यान Rakhi Sawant  बोलताना राखी म्हणाली की, एग्ज फ्रीझ करण्याची प्रक्रिया अत्यंत वेदनादायी असते. या प्रक्रियेदरम्यान महिलांना मोठा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो, असेही तिने नमूद केले. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चांना उधाण आले असून अनेकांनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे.
 
 
दरम्यान, राखी सावंतच्या Rakhi Sawant  वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चा होत असते. २०१९ मध्ये तिने एनआरआय रितेश सिंह यांच्याशी लग्न केले होते. मात्र २०२२ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर तिने आदिल खान दुर्रानी याच्यासोबत निकाह केला होता. हे नातेसुद्धा फार काळ टिकले नाही आणि २०२३ मध्ये दोघे विभक्त झाले. तिची दोन्ही लग्न अयशस्वी ठरल्यानंतरही राखीने आई होण्याची इच्छा कायम असल्याचे अनेकदा सांगितले आहे.