नागपूर,
Government Press Society सामान्यतः भटक्या कुत्र्यांबाबत भुंकणे, पाठलाग करणे किंवा चावा घेण्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र शहरातील शासकीय प्रेस सोसायटीमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला असून येथे कुत्र्यांचा ‘चप्पलचोरी’चा उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
सोसायटीमध्ये चार मजली सदनिका असून परिसरात सहा ते आठ कुत्र्यांचा समूह नेहमी फिरताना दिसतो. इमारतींचे तळमजले खुले असल्याने काही कुत्रे थेट आत प्रवेश करतात आणि प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या चपला उचलून नेतात. Government Press Society काही वेळा एक चप्पल तर कधी संपूर्ण जोडी तळमजल्यावर किंवा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली आढळते. अनेकदा चपला फाटलेल्या अवस्थेतही सापडतात. विशेष म्हणजे नवीन चपलांवर या कुत्र्यांचा अधिक डोळा असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
विशाल अपार्टमेंटमधील अनेक कुटुंबांना या प्रकाराचा फटका बसला आहे. दिलीप धापोडकर, सोमेश्वर रामटेके, पंकज शेंडे, उद्देश भिवापुरकर, समीर साखरकर, संतोष नायर, अजय ठवरे आणि तानाजी पाटील यांच्या कुटुंबीयांच्या चपला गायब झाल्याच्या घटना घडल्या आहेत. Government Press Society त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. चप्पल चोरीच्या या सततच्या प्रकारांमुळे नागरिकांनी आता इमारतींचे प्रवेशमार्ग बंद ठेवण्यास सुरुवात केली असून, कुत्र्यांचा मुक्त वावर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
सौजन्य: प्रभुदास रामटेके, संपर्क मित्र