सलमान खानचे हॉलीवूडमध्ये पदार्पण

‘7 डॉग्स’मधील कॅमिओची जोरदार चर्चा

    दिनांक :25-May-2026
Total Views |
मुंबई
Salman Khan बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खान आता आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही आपली छाप उमटवताना दिसत आहे. ‘7 डॉग्स’ या आंतरराष्ट्रीय ॲक्शन थ्रिलर चित्रपटातून सलमानने हॉलीवूडमध्ये पदार्पण केल्याची जोरदार चर्चा रंगली असून, इजिप्तमध्ये पार पडलेल्या चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान त्याच्या खास भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 

Salman Khan, Salman Khan Hollywood debut, 7 Dogs movie 
इजिप्तमध्ये नुकताच ‘7 डॉग्स’ या चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सलमान खान प्रत्यक्ष उपस्थित नसला तरी संपूर्ण कार्यक्रमात त्याच्याच नावाची चर्चा होती. प्रीमियरच्या रेड कार्पेटवर सलमानचे भव्य पोस्टर्स लावण्यात आले होते. अनेक चाहत्यांनी या पोस्टर्ससोबत सेल्फी घेत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.चित्रपटातील सलमान खानचा कॅमिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये तो केस कापण्याच्या दुकानातील दृश्यात दिसून येतो. इंग्रजी संवाद आणि त्याचा वेगळा लूक पाहून चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी या एंट्रीला “पैसा वसूल” संबोधत सलमानच्या ग्लोबल स्टारडमचे कौतुक केले आहे.
‘7 डॉग्स’मध्ये इजिप्शियन Salman Khan  अभिनेते करीम अब्देल अझीझ आणि अहमद एझ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच हॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेलुचीही या चित्रपटाचा भाग आहे. विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेता संजय दत्त हेदेखील या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.सलमान खानच्या या आंतरराष्ट्रीय पदार्पणामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या हॉलीवूड एंट्रीचे स्वागत केले असून, आगामी काळात तो आणखी ग्लोबल प्रोजेक्ट्समध्ये दिसणार का याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.