‘स्कॅम 3’मध्ये मराठमोळा चेहरा

सिद्धार्थ बोडके साकारणार सुभ्रत रॉय?

    दिनांक :25-May-2026
Total Views |
मुंबई
Scam 3 ओटीटी विश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘स्कॅम’ सीरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पहिल्या दोन सीझनना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता ‘स्कॅम 2010 : द सुभ्रत रॉय सागा’ या नव्या पर्वाबाबत उत्सुकता वाढली असून, या मालिकेत मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
 
 
Scam 3
मराठी मालिका, हिंदी चित्रपट Scam 3 आणि वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणाऱ्या सिद्धार्थ बोडकेसाठी ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. वास्तव घटनांवर आधारित आणि आर्थिक घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या ‘स्कॅम’ मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवली आहे. अशातच तिसऱ्या भागात सिद्धार्थची निवड झाल्याने मराठी प्रेक्षकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.या नव्या सीझनची कथा सहारा समूहाचे प्रमुख सुभ्रत रॉय आणि सहारा इंडिया प्रकरणाभोवती फिरणार आहे. २००० च्या दशकात सहारा समूहावर आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ उडवली होती. या मालिकेची कथा पत्रकार तमल बंद्योपाध्याय यांच्या ‘सहारा : द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकावर आधारित Scam 3  असणार आहे.दिग्दर्शक हंसल मेहता पुन्हा एकदा वास्तववादी आणि थरारक कथा प्रेक्षकांसमोर आणण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी ‘स्कॅम 1992’ आणि ‘स्कॅम 2003’ या मालिकांनी प्रेक्षकांसह समीक्षकांचीही प्रशंसा मिळवली होती. त्यामुळे ‘स्कॅम 2010’कडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.