नवी दिल्ली,
Supriya Sule नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान Supriya Sule त्यांच्यासोबत त्यांची कन्या रेवती सुळे आणि होणारे जावई सारंग लखानी उपस्थित होते. ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून, रेवती सुळे यांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
सुळे कुटुंबीयांनी Supriya Sule पंतप्रधान मोदींना वैयक्तिकरित्या विवाह सोहळ्याचे आमंत्रण दिले. या भेटीत देशातील राजकीय परिस्थितीवर कोणतीही औपचारिक चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली नसून, ही भेट प्रामुख्याने कौटुंबिक निमंत्रण आणि सदिच्छा यापुरती मर्यादित असल्याचे सांगितले जात आहे.