तेंदूपत्ता संकलन करणार्‍या महिलांना वनविभागाचे संरक्षण

    दिनांक :25-May-2026
Total Views |
मूल,
Tendu Leaf Collectors तालुक्यात सर्वत्र तेंदू हंगाम सुरू आहे. पाने गोळा करण्यासाठी महिला जंगलात जात आहेत. सिंदेवाही तालुक्यातील दुर्दैवी घटना पाहता, तेंदूपत्ता संकलन करणार्‍या महिलांना वनविभागाचे संरक्षण देण्यासाठी पुढे सरसावले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चिचपल्ली वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत तालुक्यातील मूल, जानाळा, चिचाळा, दहेगाव, चिरोली, केळझर, चिचपल्ली, महादवाडी या नियतक्षेत्रात वन कर्मचारी नियमितपणे गस्त घालत आहेत. वन कर्मचार्‍यांच्या गस्तीमुळे महिला आणि पुरूष मंडळी बिनधास्तपणे तेंदू पाने संकलित करीत आहेत.
 
 
 
gfgy768
 
वन कर्मचारी गावकर्‍यांसोबत असल्याने या कालावधीत चिचपल्ली वनक्षेत्रात आत्तापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे एका वन कर्मचार्‍याने सांगितले. याबाबत त्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभत आहे. मूल तालुका हा बफर, प्रादेशिक, सामाजिक वनीकरण आणि वनविकास महामंडळाच्या जंगलानी वेढलेला आहे. या भागात वाघ, बिबट सह इतर वन्यप्राण्यांचा मोठा संचार आहे. तेंदू पाने हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात वाघाच्या हल्ल्यासह अस्वल किंवा रानडुकरांचा हल्ला होण्याची भीती असते. त्यामुळे वन कर्मचारी तेंदू पाने संकलन करणार्‍या गावकर्‍यांना आणि झाडू काड्या वेचणार्‍या महिलांनासुद्धा संरक्षण पुरवित आहेत.