मुंबई
Tukaram Mundhe वरिष्ठ सनदी अधिकारी आणि आपल्या कामाच्या धडाडीमुळे सातत्याने चर्चेत असलेले, तसेच सातत्याने बदलीचा त्रास सहन करणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांची ही २५ वी बदली आहे.
Tukaram Mundhe दरम्यान, गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आले होते. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. त्यानुसार तुकाराम मुंढे यांनी सोमवारी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.
Tukaram Mundhe या आधी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात आयुक्त म्हणून काम करताना मोठी कारवाई केली होती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली होती. तुकाराम मुंढेंची ही साफसफाईची कामं सुरू असतानाच त्यांची बदली करण्यात आली. 31 मार्च रोजी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आणि दिव्यांग विभागातील बोगस अधिकाèयांवरची कारवाईही थांबली.
आतापर्यंत कधी, कोणत्या ठिकाणी बदली झाली?
ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग
जुलै 2009 - सीईओ, वाशिम
जून 2010 - सीईओ, कल्याण
जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना
सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई
नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी
मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका
मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका
नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन
डिसेंबर 2018 -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका
ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट— जीवन प्राधिकरण, मुंबई
जानेवारी 2021 - राष्ट—ीय मानवाधिकार आयोग भारत
सप्टेंबर - 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट—ीय आरोग्य अभियान
2022 - मराठी भाषा विभाग
जुलै 2022 - पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
जून 2024 - विकास आयुक्त (असंघटित कामगार)
ऑगस्ट 2025: सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय