सेलू,
Third Heatstroke Fatality in Selu Taluka राज्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच चढला असून जिल्ह्यातही सूर्य आग ओकत आहे. जिल्ह्यातील तापमान तब्बल ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. या प्रचंड आणि तीव्र उष्णतेमुळे जिल्ह्यातील वाहितपूर येथील ७२ वर्षीय वृद्धेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाहितपूर येथील असलेल्या कौसल्या जगन्नाथ उराडे (७२) यांचे रविवार २४ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास निधन झाले. तीव्र उष्णतेचा त्रास कौसल्या उराडे यांना झाला आणि उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला. हवामान खात्याने आणि प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. असे असले तरी वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे हाल होत आहे. यापूर्वीही सेलू तालुक्यातील दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाला, हे विशेष.