त्रिस्कंध असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नागपूर,
Triskandh Associations शहरातील सुप्रसिद्ध ज्योतिष संस्था “त्रिस्कंध अलमनी अँड एस्ट्रोलॉजर्स असोसिएशन”च्या नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया रविवार सारस्वत मंडळ हॉल येथे सायंकाळी पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयुक्त म्हणून संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व विशेष सल्लागार डॉ. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार अध्यक्षपदी डॉ. कीर्ती पाटील, सचिवपदी मोहन चौधरी, कोषाध्यक्षपदी प्रशांत नांदृणकर, जनसंपर्क प्रमुखपदी स्नेहल कुलकर्णी यांची निवड झाली आहे. तर सदस्य म्हणून डॉ. रश्मी कराळे, डॉ. सुलभा विलास कुलकर्णी आणि आनंद गिजरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
Triskandh Associations
 
यावेळी गुरुवर्य डॉ. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक डॉ. मुकुंद मोहोळकर यांनी संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. Triskandh Associations यावेळी पालक संस्था त्रिस्कंध फलादर्श अभ्यास मंडळाचे अध्यक्ष विनय कुऱ्हेकर, त्रिस्कंध वेदांग महाविद्यालयाचे अध्यापक शशांक कुलकर्णी, अनुराधा कुऱ्हेकर तसेच संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्या: डॉ, कीर्ती पाटील, संपर्क मित्र