वर्धा,
bts examination एन. ई. पी. २०२० नुसार जीवनाभिमुख शिक्षण देणारे पहिले पाऊल, हे ब्रीदवाय घेऊन एज्यूमिट अकॅडमी, (मुंबई) महाराष्ट्र राज्य आयोजित भारत टॅलेंट सर्च (बीटीएस) राज्यस्तरीय परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत वर्धा येथील विविध जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. यावर्षी पहिल्यांदाच राज्य गुणवत्ता यादीत निकषानुसार हिंगणघाट तालुयातील जांगोणा येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थी अवनी संदीप वाघ व अभिनव मनोज बनकर राज्यस्तरावर प्रथम आले आहेत. त्यांना पैकीच्या पैकी म्हणजे १५० पैकी १५० गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत त्यांनी यश संपादन केले आहे.
भारत टॅलेंट सर्च (बीटीएस) परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा, तार्किक विचारशतीचा व शैक्षणिक प्रगतीचा शोध घेणारी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मानली जाते. या परीक्षेमध्ये इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांचा सहभाग असून यावर्षी वर्धेतून जवळपास ४०० च्या वर विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांवरून ही परीक्षा दिली होती.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रत्येक वर्गातील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना एज्यूमिट अकॅडमीच्या वतीने भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो), बंगळुरू येथे शैक्षणिक भेट आयोजित केली जाते. या सहलीचा संपूर्ण खर्च अकॅडमीकडून केला जातो. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून ३१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.bts examination यातील वर्धेतील दोन प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्हा व केंद्रस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. अवनी वाघ व अभिनव बनकर यांच्या यशाबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवघरे, शिक्षक खोडे, बीटीएस परीक्षेचे समन्वयक विनय मुलकलवार, पालक व गावकर्यांनी अभिनंदन केले. तसेच बर्याच विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुका पातळीवर यश संपादन केले असून त्यांचेही विविध स्तरातून कौतुक होत आहे.