विजय सरकारच्या सत्तेचं गणित बदलणार?

राजकीय हालचालींना वेग

    दिनांक :25-May-2026
Total Views |
चेन्नई,
Vijay government's power change तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून तीन आमदारांनी अचानक राजीनामा देत नवीन राजकीय वळण निर्माण केले आहे. एआयएडीएमके पक्षाच्या तीन आमदारांनी राजीनामा देत टीव्ही या पक्षात प्रवेश केल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मरगथम कुमारेसन (मधुरंतकम), सत्यभामा (धारापुरम) आणि जयकुमार (पेरुंदुरई) या तीन आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे सादर केले. यामध्ये दोन महिला आमदारांचा समावेश आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारमधील मंत्री आधव अर्जुन यांची भेट घेऊन पक्षप्रवेश केला.
 
 
ghgh
या घडामोडीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही महिन्यांत पोटनिवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मतदारसंघांमध्ये नव्याने निवडणुका लागल्यास सत्ताधारी टीव्हीके पक्षासाठी ते निर्णायक ठरू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, एआयएडीएमकेने विधानसभा निवडणुकीत ४७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र या तीन आमदारांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी आणि सत्ताधारी पक्षातील आकर्षण यामुळे ही घडामोड घडल्याचे बोलले जात आहे. या राजकीय नाट्यानंतर सत्तेच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून आगामी पोटनिवडणुकांमध्ये कोण बाजी मारतो, याकडे संपूर्ण तमिळनाडूचे लक्ष लागले आहे.