महिलांना दरमहा ३,००० रुपये थेट खात्यात!

पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय

    दिनांक :26-May-2026
Total Views |
कोलकाता,
₹3,000 per month accounts पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ‘अन्नपूर्णा योजना’ अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा ३,००० रुपये थेट जमा केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी नादिया जिल्ह्यातील कल्याणी येथे झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर ही माहिती दिली. या योजनेची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असून २७ मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अर्ज भरल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाईल, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
 
 
bangal
५ रुपयांत मासे-भात मिळणार
दरम्यान, राज्य सरकारने सामाजिक धोरणांमध्येही मोठे बदल जाहीर केले आहेत. शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या एक किलोमीटर परिसरात मद्यविक्री केंद्रांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील सुमारे ४०० कॅन्टीन्समध्ये अवघ्या ५ रुपयांत मासे-भात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी स्वतंत्र ‘आयुष विभाग’ स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तसेच नागरिकांच्या समस्या थेट ऐकण्यासाठी ‘जनता दरबार’ उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात नोकरी, भरती आणि विविध प्रशासकीय तक्रारींसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. सरकारच्या या निर्णयांमुळे राज्यात सामाजिक आणि आर्थिक पातळीवर मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.