अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी दिली माहिती
यवतमाळ,
नगर परिषद मार्फत शहरीतील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा सक्षम, पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी विविध विकासात्क व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती नगर परिषद अध्यक्ष Adv. Priyadarshani Uike अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी मंगळवार, 26 मे रोजी दिली. यावेळी उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, नगरसेवक नितिन गिरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना अॅड. उईके म्हणाल्या, नगर परिषद अंतर्गत शहराची दैनंदिन साफसफाई नियमित व प्रभावीपणे करण्यासाठी सर्व बाबींचा समावेश असलेले सविस्तर अंदाजपत्रक तयार आले असून, त्यास तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली आहे.
या अंदाजपत्रकामध्ये सफाई कर्मचाèयांसाठी शासन निर्देशानुसार किमान वेतनाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल वृक्षांचे संवर्धन व संगोपन होण्याच्या दृष्टीने संबंधित वृक्षांना टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी 70 लक्ष खर्च करण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या. घनकचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांकडून घंटागाडीद्वारे संकलित होणाèया कचèयावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या यंत्रसामग्रीच्या स्थापनेसाठी आवश्यक शेड उभारणीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून हे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी 5 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत अशीही माहिती, नप अध्यक्ष Adv. Priyadarshani Uike अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी दिली.