आर्णीच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

    दिनांक :26-May-2026
Total Views |
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
आर्णी, 
Attack on Arni Corporator आर्णी नगर परिषद प्रभाग 1 चे शिवसेना नगरसेवक पवन सुरेश चाफले (वय 27) याच्यावर सोमवारी संध्याकाळी ओम सुरेश सवाई व अन्य एकाने गज व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. यात नगरसेवक पवन चाफलेच्या हात व डोक्याला गंभीर इजा झाली.
 
 
arni
 
Attack on Arni Corporator पवन चाफलेने आर्णी पोलिस ठाण्यात जाऊन ओम सवाई व अन्य 1 यांच्याविरुद्ध तक्रार दिली असून पुढील तपास ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात देवानंद मुनेश्वर व सहकारी करत आहेत. नगरसेवक पवन चाफलेच्या तक्रारीनंतर आर्णी पोलिसांनी ओम सुरेश सवाई (वय 25) व एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास आर्णी पोलिस करित असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.