गांधी चौकात भर दिवसा 50 हजारांची पिशवी लंपास

    दिनांक :26-May-2026
Total Views |
अंगावर घाण टाकून लक्ष विचलित : सीसीटीव्हीत कैद

वणी,
Bag Theft शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौक परिसरात चोरट्यांनी हातचलाखी करत दुचाकीला लटकवलेल्या पिशवीतील तब्बल 50 हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवार, 26 मे रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेèयात कैद झाला आहे.
 

chor 
 
लालगुडा येथील शंकर धोटे यांनी वणी येथील स्टेट बँकेतून खरेदीसाठी 50 हजार रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी एका पिशवीत ठेवून दुचाकीच्या हँडलला अडकवली होती. बँकेतून बाहेर पडल्यापासूनच चोरट्यांची त्यांच्यावर नजर असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, गांधी चौक परिसरात पोहोचल्यानंतर चोरट्यांनी धोटे यांचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्या अंगावर घाण टाकली. अचानक अंगावर घाण पडल्याने धोटे हे थांबले व शर्ट साफ करू लागले. याचा फायदा घेत मागावर असलेल्या चोरट्याने दुचाकीला लटकवलेली पैशांची पिशवी क्षणार्धात लंपास केली आणि पसार झाला.
 
 
Bag Theft  घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेèयात स्पष्टपणे कैद झाला असून पोलिसांनी फूटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, बँकेतून मोठी रल्कम काढल्यानंतर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मोठी रोकड घेऊन प्रवास करताना कुठेही न थांबता थेट घरी जावे, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.