‘बजरंगी’ हत्या प्रकरण : सहा आरोपी अटकेत

    दिनांक :26-May-2026
Total Views |
फरार आरोपी पोलिसांच्या रडारवर

उमरखेड, 
‘Bajrangi’ Murder Case गोवंश तस्कर गाडीचा पाठलाग करत असताना सुकळी येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता गजानन सुरोशे यांच्यावर तस्करांनी दगड-लाकडाने हल्ला करीत निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. ही घटना शनिवार, 23 मेच्या रात्री 12 च्या दरम्यान घडताच जिल्ह्यासह स्थानिक पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर येत घटनेतील मुख्य आरोपीला 48 तासांत मोठ्या शिताफीने जेरबंद केले. त्याच्या अटकेनंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आता सहा आरोपींना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथकासह पाच पथके तैनात करण्यात आली असून त्यांचा कसून शोध घेतल्या जात आहे.
 
 
mur dks
 
महागाववरून उमरखेडकडे गोवंशाची तस्करी करत असलेल्या वाहनाचा बजरंग दल कार्यकर्ता गजानन सुरोशे यांनी आपल्या चारचाकी वाहनाने पाठलाग केला. तस्करांच्या वाहनाचा टायर फुटल्याने डिस्कवर भरधाव वेगात वाहन महामार्गावरील सुकळी गावात टाकले. त्यांच्यामागे गेलेल्या सुरोशे यांच्या वाहनावर तस्करांनी मोठ-मोठे दगड व लाकडाने हल्ला करून त्यांची हत्या केली. घटनेमुळे उमरखेड व महागावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शंकर पांचाळ यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाèयांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवून तपास सुरू केला.
 
 
 
‘Bajrangi’ Murder Case घटनेनंतर अनेक संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. तपासाची चक्रे फिरवून घटनेतील प्रमुख आरोपी शेख सुलतान शेख अल्लावल्ली यास 48 तासांत शिताफीने अटक करण्यात आली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उमरखेड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुख्य आरोपीसह पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. यामध्ये प्रमुख आरोपी शेख सुलतान शेख अल्लावल्ली (वय 27), मोहंमद परवेज मोहंमद शफी (वय 24), रुनिरोद्दीन इक्रोमोद्दीन काजी (वय 30), शेख अजगर अहमद अब्दुल हमीद (वय 28), नोमोदोद्दीन रियाजोद्दीन काजी (वय 20), मोहंमद अरबाज मोहंमद शफी (वय 22) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अटक झालेल्या पाच आरोपींना 29 मेपर्यंत पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले असून फरार आरोपींचा माग काढण्यासाठी उमरखेड व महागाव पोलिस स्तरावर चार पथके व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.