Bakri Eid: Police Launch Swift Action विशिष्ट समाजाच्या वस्तीतून नदीकाठी बांधून आणि ईदनिमित्त कापण्यासाठी जमा करून ठेवलेल्या 25 ते 30 गायींना मंगळवार, 26 मे रोजी केलेल्या कळंब पोलिसांच्या धडक कारवाईने जीवनदान मिळाले. या कारवाईचे कळंब शहर तथा तालुक्यातील गोभक्तांनी स्वागत केले असून या कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. बकरी ईदच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध लादले असून विधानसभा अध्यक्ष यांनी गोवंशहत्या आणि तस्करी खपून घेणार नाही, तसेच गोरक्षकांच्या सुरक्षेचे सक्त निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
Bakri Eid: Police Launch Swift Action कळंब पोलिससुद्धा त्याच ताकदीने मैदानात उतरले आणि त्यांनी बकरी इदनिमित्त बांधून ठेवलेल्या गाई सोडवून आणल्या. यावेळी, ह्या गायी कोणाच्या आहेत, अशी विचारपूस केली असता, कोणीही समोर आले नाही. निर्दयपणे बांधून ठेवलेल्या गायी पोलिस प्रशासनाने ताब्यात घेत ठाण्याच्या आवारात आणून त्यांची चारापाण्याची व्यवस्था केली. आता अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची तयारी कळंब पोलिसांनी केली असून या गायी बकरी ईदच्या निमित्ताने बळी देण्याकरिता गोळा करण्यात आल्या होत्या, असाच निष्कर्ष कळंबच्या गोभक्तांनी बोलून दाखवला. विशिष्ट समाज वस्तीमध्ये कापण्याकरिता गायी बांधून असल्याच्या माहितीच्या आधारे कळंबचे ठाणेदार राजेश राठोड, उपनिरीक्षक महेंद्र साळवे, सहनिरीक्षक अमित जाधव, सहनिरीक्षक प्रमोद काळे तथा संपूर्ण पोलिस ताफा मंगळवारी दुपारी बाराच्या दरम्यान ही धडक कारवाई केली.