लखनौ,
Bakrid Holiday in Uttar Pradesh उत्तर प्रदेश सरकारने बकरीद (ईद-उल-अजहा)च्या सार्वजनिक सुट्टीबाबत महत्त्वाचा निर्णय घेत स्पष्टता दिली आहे. राज्यातील सुट्टीची तारीख बदलण्यात आली असून आता ही सुट्टी 28 मे 2026 (गुरुवार) रोजी लागू राहणार आहे.यापूर्वी राज्य सरकारने 27 मे रोजी बकरीदची सुट्टी जाहीर केली होती. मात्र चंद्रदर्शन आणि इस्लामिक कॅलेंडरनुसार सणाच्या तारखेत बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय पुनर्विचार करून सुधारित करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, 2026 सालच्या सुट्ट्यांच्या यादीत आवश्यक बदल करण्यात आले असून आता संपूर्ण उत्तर प्रदेशात 28 मे रोजी ईद-उल-अजहा निमित्त सार्वजनिक सुट्टी असणार आहे. या दुरुस्तीनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.