यवतमाळ,
brahman mahasangh मूळ यवतमाळ निवासी आकाश रेखा ओम त्रिवेदी याने संघ लोकसेवा आयोग द्वारा यूपीएससी परीक्षेत एआयआर 73 प्राप्त केले आहे. वर्तमान जळगाव निवासी 23 वर्षीय आकाश प्रतिभासंपन्न व मेधावी आहे. आकाशने कोटा येथून बारावीत उत्तम गुण प्राप्त केले. त्यानंतर आयआयटी कानपूर येथून संगणक अभियांत्रिकीत यश प्राप्त केले. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादसाठी निवड झाली.
brahman mahasangh वैशिष्ट्य म्हणजे त्याने आयआयटी, आयआयएम व आयएएस या तीनही परीक्षांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले. यवतमाळच्या त्रिवेदी परिवाराच्या गुणी सुपुत्राचा येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाद्वारे सन्मान करण्यात आला. यवतमाळ जिल्हा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष संजीव जोशी यांनी आकाशचा पुष्पहार, पुष्पगुच्छ, शेला व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. यावेळी अॅड. राकेश त्रिवेदी, वर्धा येथील अटल पांडे, मनीष दुबे, राम साकळे, रवी मिश्रा, परीक्षित शर्मा व त्रिवेदी कुटुंबीय उपस्थित होते.