145 किमी रेल्वेमार्गास एकत्रित मंजुरी द्यावी
शकुंतला रेल्वे विकास समितीची मागणी
यवतमाळ,
British Shakuntala Railway Line पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाèया दारव्हा-यवतमाळ-मुर्तिजापूर-अचलपूर ‘शकुंतला’ रेल्वे मार्ग प्रकल्पात मध्य रेल्वेने महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. यवतमाळमुर्तिजापूर आणि मुर्तिजापूरअचलपूर या रेल्वेमार्गांच्या ब्रॉडगेज रूपांतरणाचे विस्तृत प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने 6 मार्च 2026 रोजी रेल्वे मंडळाकडे सादर केले असल्याची माहिती रेल्वे विकास समितीला मिळाली आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासह पश्चिम विदर्भाच्या सामाजिक व औद्योगिक प्रगतीसाठी हा रेल्वेमार्ग अत्यंत आवश्यक मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत या प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. त्यामुळे शकुंतला रेल्वेचा ब्रॉडगेज प्रकल्प हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. दरम्यान, 2022 पासून शकुंतला रेल्वे विकास समिती सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडे या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत आहे. समितीच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये या प्रकल्पासाठी 50 टक्के आर्थिक सहभागाची घोषणा केली होती.
British Shakuntala Railway Line या प्रकल्पाचे एफएलएस सर्वेक्षण ऑक्टोबर 2022 मध्ये मंजूर झाले होते. हे सर्वेक्षण मध्य रेल्वेकडून आता पूर्ण झाले आहे. कॅबिनेट समितीची अंतिम मंजुरी मिळण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल विविध स्तरांवरून मंजुरीसाठी पुढे जात असतो. यासाठी वित्त विभाग व नीती आयोगाची मंजुरी घ्यावी लागते. यानंतर रेल्वे मंडळाकडून मंत्रिमंडळ समितीपुढे प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येतो. अनेक दशकांपासून धीम्या गतीने सुरू असलेल्या या कामाला आता मूर्त रूप प्राप्त होताना दिसत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याची भाग्यरेखा ठरणारा हा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या शकुंतला ब्रॉडगेज रूपांतरणामुळे पश्चिम विदर्भाचा औद्योगिक, सामाजिक व आर्थिक विकास वेगाने होण्यास मदत होईल. तसेच शेतकèयांचा कृषीमाल कमी वाहतूक खर्चात मुंबईसह मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.
145 किमीला एकत्रित मंजुरी द्यावी
रेल्वे बोर्डाने यवतमाळ मुर्तिजापूर आणि मुर्तिजापूर अचलपूर असे दोन भाग केले आहेत. वर्धानांदेड रेल्वेमार्ग तसेच हावडामुंबई मुख्य रेल्वेमार्गाशी जोडणारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प असल्याने केंद्र शासनाने या संपूर्ण 145 किलोमीटरच्या रेल्वेमार्गास एकत्रित मंजुरी द्यावी, अशी मागणी शकुंतला रेल्वे विकास समितीने केली आहे.