‘चक दे इंडिया’ फेम अभिनेते रमाकांत दायमा यांचे निधन

    दिनांक :26-May-2026
Total Views |
मुंबई
chak-de-india-fame-actor ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दायमा यांचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. अभिनेत्री शुंभागी लाटकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांनी त्यांचा एक जुना व्हिडीओही शेअर केला आहे आहे.
 
ramakant dayma
 
chak-de-india-fame-actor प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दायमा ज्यांनी कित्येक फिल्ममध्ये भूमिका केल्या आहेत. शाहरूख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातही ते दिसले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत होते.
त्यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी इन्स्टाग्रामवर ही बातमी दिली. त्यांनी रमाकांत यांचा एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते इतर कलाकारांसोबत आनंदाने गाताना आणि नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करून शुभांगी यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.