चंद्रपूर,
Tigress Cub Captured सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे एका वाघिणीने चार महिलांच्या नरडीचा घोट घेतला. एकाच वेळी चार जणांच्या मृत्यूने खळबळ माजली. यंत्रणेचे चक्र वेगाने फिरले. वाघिणीला जेरबंद करण्यात आले. तिच्या पिल्लांनाही पकडण्याची परवानगी मिळाली आणि त्यातील एका पिलाला पकडण्यात आले आहे. उर्वरित तीन पिलांचा शोध सुरू आहे.
सोमवारी रात्री वाघिणीच्या एका पिल्लाला पकडण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9:30 वाजता एका शार्पशूटरने त्याला भूल देणारे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले आणि पिंजर्यात बंदिस्त केले. सोमवारी सकाळी वाघिणीच्या चार पिल्लांना पकडण्याची परवानगी मिळाली होती. Tigress Cub Captured सध्या तीन लाईव्ह कॅमेरे आणि 30 कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले आहेत. डॉ. रविकांत खोब्रागडे आणि शूटर अजय मराठे एका प्लॅटफॉर्मवरून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. रात्री, जेव्हा एक पिल्लू पिल्लाजवळ आले, तेव्हा त्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पिंजर्यात बंद करण्यात आले. यापूर्वी, शनिवारी पवनपार परिसरातील एका तलावाजवळ वाघीण टी-2 ला बेशुद्ध करून पकडण्यात आले होते.
मृतकांच्या कुटुंबियांना तात्काळ साहाय्य म्हणून 25,000 रुपये देण्यात आले. 25 लाख रुपयांच्या सानुग्रह मदतीचा भाग असलेला 10 लाख रुपयांचा धनादेश आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सोमवारी वितरित करण्यात आला. Tigress Cub Captured यावेळी डीसीएफ कुमारस्वामी, ब्रह्मपुरी, एसीएफ अरविंद आणि आरएफएओ अंजली सायंकर हेही उपस्थित होते. दरम्यान, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी गुंजेवाही गावातील मृताच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
त्या छायाचित्रकाराची चौकशीः शुक्ल
बंगळुरू स्थित एका छायाचित्रकाराची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली असून, त्याचे लॅपटॉप, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले गेले आह, अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र पकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ल यांनी दिली. संबंधित छायाचित्रकारावर जंगलामध्ये नियमाबाह्य हालचाली करणे, रात्री फिरणे, वाहनातून उतरून छायाचित्रीकरण तसेच वाघांना आकर्षित करण्यासाठी मेलेली जनावरे जंगलात आणल्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहे. Tigress Cub Captured ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि परिसरातील ज्युनिअर बजरंगसह काही वाघ आणि बछडे बर्याच काळापासून दिसत नसल्याने पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.