भाजपाने आमचे नगरसेवक पळवले!

काँगे्रसचे आ. विजय वडेट्टीवार यांचा आरोप

    दिनांक :26-May-2026
Total Views |
‘नॉट रिचेबल’ नगरसेवकांच्या घरी ‘व्हिप’ चिपकवू
चंद्रपूर,
MLA Vijay Wadettiwar विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीची रंगत एव्हाना सुरू झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार बंटी भांगडिया यांनी काँगे्रसचे जवळपास 60 ते 70 नगरसेवक पळवले असल्याचा गंभीर आरोप विधीमंडळाचे पक्षनेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी लावला आहे.
 
 
MLA Vijay Wadettiwar
 
आ. वडेट्टीवार पुढे म्हणाले, भाजपाने पळवलेले ठिकठिकाणच्या नगर परिषद व नगर पंचायतीचे काँगे्रस नगरसेवक आमच्यासाठी ‘नॉट रिचेबल’ आहेत. आता आम्ही त्या नगरसेवकांच्या घरी काँगे्रस पक्षाचा ‘व्हिप’ चिपकवू आणि तरीही त्यांनी पक्षविरोधी मतदान केले, तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, अशी तंबीही वडेट्टीवार यांनी दिली आहे. आमच्या काही नगरसेवकांना 5 लाख आणि निवडणुकीनंतर 5 लाख असे आमीष दाखवून विकत घेतले गेले आहे. MLA Vijay Wadettiwar काहींना तर कारवाईची धमकी देऊन आपल्यासोबत घेऊन गेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. भाजपाचा आमदारच कंत्राटदार असल्याने त्यांच्याकडे रग्गड पैसा आहे आणि तो ते खर्च करीत आहेत. पण निवडणूक कशी लढवली जाते हे आम्हालाही येते. आम्हीही आमचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर मैदानात पूर्ण ताकदीने उतरू, असेही वडेट्टीवार म्हणाले.
काँगे्रस नगरसेवक माझ्या संपर्कात नाहीः आ. भांगडिया
आम्ही सत्तेत असल्याने मतदार संघाच्या विकासकामांसाठी काँगे्रसचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात असतात. आम्ही त्यांचीही कामे करतो. विविध कार्यक्रमांतून ते आमच्यासोबत दिसतात. त्यामुळे त्यांच्यासोबत छायाचित्र आहेतच. परंतु, निवडणूक म्हणून काँगे्रसचा कोणताही नगरसेवक माझ्या संपर्कात नाही. MLA Vijay Wadettiwar काँगे्रसच्या नेत्यांना त्यांचे नगरसेवक सांभाळता येत नाही, त्याला आम्ही काय करावे. सद्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे नगरसेवक आपल्या परिवारासोबत फिरायला गेले असतील. त्यांचा भ्रमणध्वनी ‘नॉट रिचेबल’ असेल, त्याला आम्ही जबाबदार नाही, असे स्पष्टीकरण आ. बंटी भांगडिया यांनी दिले.
 
वयाच्या अटीमुळे शिवानी वडेट्टीवारांची माघार? 
आ. विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार या सदर निवडणुकीसाठी उत्सुक आहेत. मात्र, वयाची अट आडवी येत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे किमान वय 30 वर्ष आवश्यक आहे. पण शिवानी वडेट्टीवार यांना ही अट पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी कमी पडतो आहे. MLA Vijay Wadettiwar याबाबत आ. विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, हो तांत्रिक अडचणीमुळे सध्या शिवानीला माघार घ्यायला सांगितले आहे, असे ते म्हणाले.