जैन साधू संतांवर होणार्‍या हल्ल्यांसाठी सुरक्षा निती तयार करा

सकल जैन धर्मियांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :26-May-2026
Total Views |
हिंगणघाट, २६ मे
Demand of the Entire Jain Community मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रसंत आचार्य १०८ विद्यासागर महाराज यांच्या शिष्या आर्यिका व उपशममति माताजी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांबाबत तसेच अहिंसा परमो: धर्म या प्रमुख वृत्तीने जगणारे, जगा आणि जगू द्या याची शिकवण देणार्‍या जैन साधू-साध्वी यांच्यावर होणार्‍या प्राणघातक हल्ल्यांची गंभीर दखल घेत येथील सकल जैन धर्मियांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून जैन साधू संतांवरील हल्ल्यांबाबत सुरक्षा निती तयार करण्याची मागणी केली आहे.
 
 

jaian 
 
निवेदनात नमुद केल्यानुसार, मध्यप्रदेशातील रिवा येथील जैन साध्वीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांबाबत एसआयटी गठीत करावी, दोषींवर कठोर कारवाई करा, संत सुरक्षा प्रोटोकॉल लागू करावा, राष्ट्रीय संत सुरक्षा निती तयार करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवळी श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, भागचंद ओस्तवाल, शिखरचंद मुनोत, अनिल कोठारी, शांतीलाल कोचर, प्रदीप कोठारी, उदय चोरडीया, संजय साखरे, नरेंद्र चुंबळे, विनोद पोतदार, हरीश कासवा, तेजमल गांधी, विजय कासवा, कमल रांका, सुरेश गांधी, आदी उपस्थित होते.