दिव्यांका-विवेक बनले पालक!

    दिनांक :26-May-2026
Total Views |

vivek
 
 
मुंबई,
Divyanka and Vivek Become Parents टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जोडपे दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हे स्टार कपल आता जुळ्या मुलांचे आई-वडील बनले असून, ही गोड बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.विवेक दहियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. पोस्टमध्ये दोन नवजात बाळांचा सुंदर फोटो दिसत असून, दोघांनाही निळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत. या फोटोसोबत विवेकने अतिशय भावनिक कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिव्यांका आणि विवेक हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात आदर्श जोडप्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या या नव्या आनंदामुळे चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.