आर्णी,
Farmer Suicide कर्जबाजारी व नापिकी झाली पेरणीचे दिवस जवळ येत असल्याच्या चिंतेने दिग्रस तालुक्यातील विठाळा येथील शेतकरी रोहिदास काळू चव्हाण (वय 45) यांनी रविवार, 24 मे रोजी दुपारी 4.30 वाजता स्वत:च्या शेतात विष प्राशन केले. दिग्रस येथे प्राथमिक उपचार करून यवतमाळला जात असताना आर्णी ग्रामीण रुग्णालयात तपासले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Farmer Suicide या घटनेची तक्रार भाऊ कैलास काळू चव्हाण यांनी आर्णी पोलिस ठाण्यात दिली. रोहिदास चव्हाण यांच्याकडे 2 एकर शेती असून त्यावरच त्यांचा कुटूंबाचा उदरनिर्वाह आहे. त्यांच्यामागे पत्नी, एक विवाहित मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.