शेतकऱ्यांना स्वतःच्या वाहनासह कॅनमध्ये मिळणार डिझेल

    दिनांक :26-May-2026
Total Views |
जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश जारी
शेत मशागतीसाठी शेतकऱ्यांना दिलासा
पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध

यवतमाळ, 
Farmers to receive diesel in cans  खरीप हंगामात कृषी यंत्राद्वारे शेत मशागतीची लगबग सुरू असून त्यासाठी शेतकèयांना डिझेलची आवश्यकता लक्षात घेता जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या इंधन टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये डिझेल वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी पेट्रोल पंप चालक व मालकांना दिले आहेत.
 

y26May-Shetkari 
 
यवतमाळ जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तीनही कंपन्यांचा पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठाही आहे. परंतु समाज माध्यमांवर पेट्रोल-डिझेल विक्रीमध्ये तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसून येत आहेत. या परिस्थितीच्या अनुषंगाने व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेचं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शेतीच्या कामकाजासाठी डिझेलची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे सद्यस्थितीचा विचार करता पेट्रोल, डिझेलबाबत उपाययोजना करणे आवश्यक होते.
 
 
Farmers to receive diesel in cans  या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपवाल्यांनी शेतकऱ्यांच्या वाहनामध्ये पेट्रोल, डिझेल हे केवळ इंधनाच्या टाकीतच वितरित करावे. तसेच शेतकèयांनी स्वतःचे वाहन पूर्णपणे भरून त्यांच्या ट्रॅक्टरसोबत आरसी बुक सादर केल्यास त्याची पडताळणी करून त्यांना सोबतच 40 लिटर, एक कॅन डिझेलचा पुरवठा करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतीचे वाहन हजर नसताना पेट्रोल, डिझेल खुले उदा. कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांड्यात विक्री किंवा पुरवठा करण्यात येऊ नये. रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकाèयांनी दिले आहेत.

सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवा
रात्रीच्या वेळी कॅनमध्ये डिझेल, पेट्रोलची विक्री होत असल्याबाबत तक्रारी आहेत. पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी तसेच तसेच सीसीटीव्ही रिपोर्ट 40 दिवसांपर्यंत जतन करून तो तपासणीवेळी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच संबंधित तालुक्यातील निरीक्षण अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे याची शहानिशा करून तसा अहवाल सादर करावा, असे जिल्हाधिकाèयांनी आदेशित केले आहे.

साठेबाजी, काळाबाजार रोखण्यासाठी तपासणी करा
पेट्रोल व डिझेल यांची साठेबाजी किंवा काळाबाजार होणार नाही. तसेच अतिरिक्त दराने पेट्रोल व डिझेलची विक्री होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी. तहसीलदारांनी पथक गठीत करून त्यांच्या तालुक्यातील पेट्रोल पंपांची तपासणी करून प्रत्येक आठवड्याला अहवाल सादर करावा. प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्याजवळ असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील.

इंधनाचा साठा करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका
नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन भरून साठा करू नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंपवाल्यांची राहणार आहे, असेही या आदेशात म्हटले आहे.