अधिक मासात योग वर्गात अन्नदान; सुनीता पिंपळकरांचा गौरव

    दिनांक :26-May-2026
Total Views |
नागपूर,
Adhik Maas अधिक मासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून पंडित दीनदयाल उपाध्याय बगीचा येथील योग साधना वर्गात ज्येष्ठ साधिका सुनीता पिंपळकर यांनी सेवाभावाचे अनोखे दर्शन घडविले. झालेल्या योग वर्गात उपस्थित सुमारे 40 ते 45 साधक व योगगुरूंना सुनीता यानी स्वतःच्या हाताने मसालेभात, कढी, लाडू आणि जलेबी असा रुचकर अल्पोपहार वाढला. अधिक मासात अन्नदानाला विशेष महत्त्व असल्याने साधकांच्या साधनेला ऊर्जा मिळावी या पवित्र हेतूने त्यांनी हे अन्नदान केले.
 
Adhik Maa
 
यावेळी योगगुरू नामदेव फटिंग यांनी सुनीता पिंपळकर यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. तसेच त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सन्मानार्थ कविता सादर करून त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ साधिका सावित्री देवकर आणि मालती कोरडे प्रमुख उपस्थित होत्या. सूत्रसंचालन वंदना तांदूळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोरेश्वर मेघरे यांनी मानले. Adhik Maas अधिक मासात अन्नदान करून सुनीता पिंपळकर यांनी समाजापुढे सेवाभावाचा आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. योग वर्ग हा केवळ व्यायामाचा उपक्रम नसून संस्कार व सेवाभावाचे केंद्र आहे, याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला. या कार्यक्रमास पद्माकर आगरकर, श्रीराम दुरगकर, महादेव बोराडे, सुरेश धामणकर, अरविंद गुंटेवार, कल्पना गाडगे यांच्यासह अन्य साधक-साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: श्रीराम दुरुगकर, संपर्क मित्र