भाजयुमोची कठोर कारवाईची मागणी
यवतमाळ,
Gajanan Suroshe Murder Case उमरखेड, महागाव येथील गोरक्षक गजानन मारोती सुरोशे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनातून या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करावे, वारंवार गो-तस्करीचे गुन्हे करणाèया टोळ्यांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, तसेच मृतकाच्या कुटुंबियांना न्याय व आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
Gajanan Suroshe Murder Case यावेळी दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री सूरज जैन, परीक्षित आडे, रोहन यादव, जय चौधरी, अभिनव तिवारी, आदिनाथ राखे, नयन गुप्ता, सिद्धेश लांडे, पूर्वेश उपासनी, जीवन निमकर, पंकज दाडे, प्रवीण डायरे, उमेश राठोड, सत्यजित आडे, यश वर्धने, पीयूष दुधनकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.