कधी पाहिला आहे का दुधाचा तलाव!

    दिनांक :26-May-2026
Total Views |
बीजिंग
milk lake चीनच्या इनर मंगोलिया या स्वायत्त प्रदेशात एक सरोवर आहे ते म्हणजे चागान नूर. हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि निसर्गरम्य सरोवर आहे. हे पर्यटकांमध्ये मिल्क वे किंवा दुधाचा तलाव म्हणून ख्यात आहे.
 
milk lake 
 
milk lake हे सरोवर चीनच्या उत्तर भागात असलेल्या इनर मंगोलियाच्या झिलिन गोल या गवताळ प्रदेशात आहे. चागान नूर हा मंगोलियन शब्द आहे. मंगोलियन भाषेत चागान म्हणजे पांढरा आणि नूर म्हणजे तलाव. म्हणजेच याच्या मूळ नावाचा अर्थच पांढरे सरोवर असा होतो.
 
milk lake या सरोवराला दुधाचा तलाव म्हणण्यामागे मुख्यत्वे दोन कारणे आहेत. यामध्ये वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही मुद्यांचा समावेश आहे. हे एक अल्कधर्मी (अल्कलाईन) म्हणजेच खाèया पाण्याचे सरोवत आहे. उन्हाळ््यात पाण्याचे बाष्पीभवन होते, तेव्हा सरोवराच्या तळाशी आणि काठावर मोट्या प्रमाणात नैसर्गिक पांढरे क्षार, सोडा आणि खनिजांचे थर साचतात. जेव्हा सूर्यप्रकाश या साचलेल्या पांढèया क्षारांवर आणि उथळ पाण्यावर पडतो, तेव्हा संपूर्ण सरोवराचा रंग एखाद्या विस्तीर्ण दुधाच्या समुद्रासारखा पांढराशुभ्र दिसू लागतो. लांबून पाहताना असे वाटते की जणू मैदानात दूध पसरले आहे.
 
milk lake मंगोलियन संस्कृतीमध्ये दूध हे अत्यंत पवित्र आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. येथील स्थानिक मंगोलियन लोक निसर्गाची आणि सरोवराची पूजा करतात. या परंपरेचा एक भाग म्हणून ते सरोवराचा आदर करण्यासाठी आणि आशीर्वाद मागण्यासाठी त्यात दूध अर्पण करतात. या धार्मिक आणि सांस्कृतिक जोडणीमुळेही लोक याला मिल्क लेक म्हणतात.