सावकारी पथकाची पुसदमध्ये झडती
आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त
यवतमाळ,
Illegal Money-lendingअवैध सावकारी व्यवहारांच्या तक्रारींची दखल घेत सहकार विभागाने पुसद तालुक्यात मंगळवार, 26 मे रोजी दोन ठिकाणी झडती घेतली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमांतर्गत झालेल्या या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश, स्टॅम्पपेपर, डायèया, खरेदीखत व इतर दस्तऐवज जप्त करण्यात आले. सावकाराचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुसद यांच्या कार्यालयास रोहित बाळासाहेब सुरोशे यांच्यातर्फे शिल्पा बाळासाहेब सुरोशे यांनी गैरअर्जदार यशवंत बाबुराव पल्लेवार यांच्याविरुद्ध केलेल्या अवैध सावकारीबाबतच्या तक्रारीनुसार सावकारी पथकाने पल्लेवार यांच्या घरी झडती कार्यवाही केली. यामध्ये आक्षेपार्ह 18 कागदपत्रे, दस्तऐवज, कोरे धनादेश व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आले.
तसेच भालचंद्र अच्युत धुमाळ यांनी सुनील राजेश्वर कोमरवल्लीवार, नीता सुनील कोमरवल्लीवार, विठ्ठल शंकर लाड व दिलीप शंकर लाड यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अवैध सावकारीच्या तक्रारीनुसार सावकारी पथकाने मंगळवारी कोमरवल्लीवार यांच्या घरून आक्षेपार्ह 60 कागदपत्रे, दस्तऐवज, खरेदी खत, डायèया व इतर कागदपत्रे जप्त केली. तसेच लाड यांचे पुसदचे घर व दुकान आणि रोहडा येथील घर व दुकानाची झडती घेऊन आक्षेपार्ह 20 कागदपत्रे, दस्तऐवज, स्टॅम्पपेपर, चिठ्ठ्या, डायèया जप्त करण्यात आल्या. या जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
Illegal Money-lending या कारवाईत सहायक निबंधक मस्के यांच्या नियोजनात 6 सावकारी पथकांद्वारे 6 ठिकाणी झडती कारवाई करण्यात आली. या पथकामध्ये घाटंजीचे कैलाश खट्टारे, दारव्हाचे हिरुडकर, दिग्रसचे सुरपाम, राळेगावचे अनिल नाईक, प्रकाश झळके, चेतन राठोड, लेखापाल सतीश जाधव, काळे, राठोड, गायकवाड, सुमेध ठमके, संतोष गोरे, माणिक चव्हाण, कांबळे, इंगोले, राठोड, वर्षा चौधरी, सूर्यकांत खरतडे, काळमोरे, रोशन देवकते, बिहाडे, खुरसडे, सविता चांदेकर, किशोर गावंडे, वानखेडे, धुळगुंडे, गाडे, रामदास रिठे, सरला जिलटे, अमोल राठोड, श्यामल पवार, रेखा शेंद्रे, वैभव ठोंबरे, नितीन भालेराव, कदम, मनवर सहभागी होते.