वडिलांच्या विधीसाठी इंजिनिअर रशीदला अंतरिम जामीन

    दिनांक :26-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Interim Bail for Engineer Rashid दिल्ली उच्च न्यायालयाने बारामुल्लाचे खासदार इंजिनियर रशीदला त्याचे दिवंगत वडिलांच्या ४०व्या दिवसाच्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन २५ जून ते ३० जून या कालावधीसाठी देण्यात आला आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयात इंजिनिअर रशीद यांनी स्वतः हजर राहून वडिलांच्या ४०व्या दिवसाच्या विधींचे धार्मिक महत्त्व स्पष्ट केले.या अर्जाला राष्ट्रीय तपास संस्थेने विरोध केला होता. मात्र न्यायालयाने सांगितले की, अशा स्वरूपाच्या प्रकरणात अनावश्यक विलंब होऊ नये आणि २५ ते ३० जूनपर्यंतची परवानगी मोठा मुद्दा नाही.
 
 

Interim Bail for Engineer Rashid 
 
याआधीही रशीद यांना २ जूनपर्यंत सशर्त अंतरिम जामीन देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आत्मसमर्पण करावे लागणार आहे. नवीन आदेशानुसारही अंतरिम जामिनाच्या अटी पूर्वीप्रमाणेच राहतील आणि त्यासाठी नव्याने जामीनदार किंवा बंधपत्र देण्याची गरज भासणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे रशीद यांना कुटुंबीयांसोबत धार्मिक विधी पार पाडण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोक व्यक्त केला होता.