बकरीदपूर्वी बाजारात दिसला पाक क्रिकेटपटू रिझवान

    दिनांक :26-May-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistani Cricketer Rizwan Spotted in Market पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर तो बकरीद (ईद-उल-अझहा) सणाच्या तयारीसाठी जनावरे खरेदी करण्यासाठी बाजारात दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रिझवान मास्क आणि चष्मा घालून ओळख लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.माध्यमांच्या माहितीनुसार, रिझवान गेल्या अनेक वर्षांपासून बकरीदच्या निमित्ताने जनावरांची खरेदी करून सामाजिक उपक्रमात सहभागी होतो. यंदाही त्याने मोठ्या प्रमाणात बकऱ्या खरेदी केल्याचे दावे केले जात आहेत, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
 
 
Eid al-Adha
 
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी रिझवानला संघातून वगळले होते. ३० मेपासून पाकिस्तानमध्ये सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी नव्या यष्टीरक्षकांची निवड करण्यात आली आहे. याआधी रिझवान टी-२० संघातूनही बाहेर होता, तर सध्या तो केवळ कसोटी संघाचा भाग आहे. रिझवानच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीकडे पाहिले तर त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे तो पाकिस्तानच्या प्रमुख खेळाडूंमध्ये गणला जातो, तरीही अलीकडील निवड निर्णयांमुळे त्याच्या भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे.